Saree Stories

अस्सल पैठणी कशी ओळखाल?

पैठणी ही फक्त साडी नसून ती महाराष्ट्रीयन परंपरेचा अमूल्य वारसा आहे. हातामागावर विणलेल्या पैठणीचा रूबाब काही वेगळाच. हे भरजरी वस्त्र कोणत्याही स्त्रीच्या रूपाला राजस तेज देतं. याच आकर्षणामुळे अनेकदा स्वस्त, मशीनमेड किंवा नकली पैठणी खरेदी केली जाते. पैठणीसारखं अस्सल महावस्त्र खरेदी करताना काही साध्या गोष्टी लक्षात ठेवल्या, तर तुम्हीही खऱ्या पैठणी खरेदीचा आनंद अनुभवू घेऊ शकाल.

अस्सल पैठणी ओळखण्याचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे पैठणी हातमागावर विणलेली आहे का? रेशमाची, झरीची गुणवत्ता तपासूनच पैठणी अस्सल असल्याची खात्री करावी. खरी पैठणी शुद्ध रेशामाच्या धाग्यामुळे तिचा स्पर्श मऊ, उबदार आणि नैसर्गिक असतो. ती पुढून जितकी सुंदर दिसते, तितकीच तिची मागची बाजूही स्वच्छ, व्यवस्थित  आणि नीट असते. पण जर, साडीच्या पाठीमागे धागे ढिले, सलग मशीनच्या रेषा किंवा असमतोल ताण दिसला, साडीचे कापड हाताळताना कडक वाटली तर ती पैठणी हातमागावर विणलेली नसून नकली असण्याची शक्यता जास्त आहे.

पैठणीतील मोर, कमळ, पोपट, नारळी काठ, मुनिया काठ अशासारखे नक्षींचे प्रकार हे पारंपारिक हातमागावरील अस्सल पैठणीत अतिशय स्पष्ट, उठावदार आणि देखणे दिसतात. पण जर ही नक्षी सपाट, परफेक्ट गोलाकार असलेली असेल तर ती मशीनवर केलेली साडी आहे असं समजावं. 

पैठणीला चमक येते ते झरीमुळे. खऱ्या पैठणीत सोनकळी किंवा चांदीची झरी वापरली जाते. अशा झरीचा रंग सौम्य, नाजूक आणि साजेसा चमकदार असतो. नकली झरी जास्त चकचकीत, पिवळसर किंवा कृत्रिम दिसते. तुम्ही जर हलक्या हाताने घासून पाहिल्यावर अस्सल झरीची चमक कायम राहते.

अस्सल पैठणीमध्ये दोन रंग एकातून दुसऱ्यात इतके सहज मिसळतात कि त्याचं द्विरंगी सौदर्य तुम्हाला आपलंसं करतं. रंग जणू एकमेकांत शांतपणे विरघळतात—हीच द्विरंगी पैठणीची खासियत. रंग सपाट, एकसुरी किंवा कमी तेजाचा वाटला तर ती साडी नकली असण्याची शक्यता असते

शुद्ध रेशीम, अस्सल झरी वापरल्यामुळे खरी पैठणी हातात घेतल्यावर वजनाला भरदार वाटते. तर, मशीनवरच्या साड्या या हलक्या असतात. विणकरांच्या मेहनतीने साकारलेली एक पैठणी विणायला ३ ते ६ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागतो.पैठणीचा दर्जा अतिशय उत्तम असतो त्यामुळे अशा पैठण्या महाग असल्या तरी ही गुतंवणूक आयुष्यभराची असते.

पैठणी खरेदी करताना नेहमी हातमागावर काम करणाऱ्या विणकरांकडून, किंवा अस्सल हातमाग पैठण्या विकणाऱ्या विश्वासू दुकानातूनच साडी घ्यावी. तेथे तुमचे पैसे योग्य ठिकाणी आणि योग्य गुणवत्तेसाठी वापरले जातात.
Rajasvi Silks मध्ये आम्ही फक्त अस्सल, हातमागावर विणलेल्या पैठण्या देतो.
दर्जा, पारंपरिक सौंदर्य आणि शुद्ध रेशीम यांना आम्ही सर्वात जास्त महत्त्व देतो.
तुम्ही आमच्याकडून घेतलेली पैठणी ही तुमच्यासाठी आयुष्यभराची गुंतवणूक ठरू शकते.