प्रीमियम साडी लॉयल्टी व
ॲडव्हान्स खरेदी सदस्यता योजना
SILK CLUB by Rajasvi Silks ही वधू, साडीप्रेमी, साड्या खरेदी करणारे ग्राहक, सणासुदीची खरेदी करणाऱ्या कुटुंबांसाठी तयार केलेली विशेष ग्राहक लॉयल्टी व ॲडव्हान्स खरेदी सदस्यता योजना आहे.
या योजनेअंतर्गत सदस्य दरमहा निश्चित रक्कम जमा करून भविष्यातील साडी खरेदीसाठी स्टोअर क्रेडिट तयार करू शकतात. सर्व हप्ते वेळेत पूर्ण केल्यानंतर ब्रँडकडून विशेष लॉयल्टी बेनिफिट दिला जाऊ शकतो.
सिल्क क्लब मेंबरशिप रचना
सदस्य आपल्या पसंतीनुसार ₹१,०००, ₹२,०००, ₹३,०००, ₹५,००० किंवा ₹१०,००० यापैकी मासिक योजना निवडू शकतो.
सदस्य सलग १0 महिने निश्चित रक्कम दर महिन्याला नियमितपणे भरतील.
सर्व हप्ते वेळेत पूर्ण केल्यास ब्रँडकडून १ अतिरिक्त हप्त्यावर लॉयल्टी बेनिफिट दिला जाईल.
जमा झालेली एकूण रक्कम फक्त स्टोअरमधील उपलब्ध पात्र साड्या व उत्पादनांच्या खरेदीसाठी वापरता येईल.
सदस्यांसाठी विशेष फायदे
नवीन कलेक्शनसाठी प्राधान्य प्रवेश
नवीन ब्रायडल, फेस्टिव्ह आणि लिमिटेड एडिशन कलेक्शनसाठी प्राधान्य.
सणासुदीचे ऑफर्स
दिवाळी, अक्षय तृतीया, गुढीपाडवा व लग्नसराई काळात विशेष ऑफर्स.
ब्रायडल शॉपिंग सहाय्य
लग्नासाठी विशेष खरेदी मार्गदर्शन व स्टायलिंग सहाय्य.
फॅमिली रिडेम्प्शन सुविधा
कुटुंबातील जवळच्या सदस्यांसाठी रिडेम्प्शनची सुविधा व्यवस्थापनाच्या मंजुरीनुसार उपलब्ध असू शकते.
खरेदीसाठी पात्र उत्पादने
सदस्य ही रक्कम त्यांच्या पसंतीची कोणतीही साडी राजस्वी सिल्कस च्या वेबसाईट वरून खरेदी करण्यासाठी वापरू शकतात.✨🌐
अटी व नियम
- सर्व हप्ते पूर्ण झाल्यानंतरच रिडेम्प्शन करता येईल.
- रक्कम फक्त स्टोअरमधील उत्पादन खरेदीसाठी वापरता येईल.
- रोख स्वरूपात रक्कम देण्यात येणार नाही.
- लॉयल्टी बेनिफिट रक्कम परत मिळणार नाही.
- उत्पादन खरेदीवेळी लागू GST व इतर कर आकारले जातील.
- रिडेम्प्शन कालावधी व्यवस्थापनाकडून स्वतंत्रपणे जाहीर केला जाईल.
- अंशतः रिडेम्प्शन व्यवस्थापनाच्या निर्णयानुसार दिले जाऊ शकते.
- सदस्याने योजना पूर्ण होण्यापूर्वी बंद केल्यास:
- लॉयल्टी बेनिफिट रद्द होऊ शकतो.
- फक्त पात्र मूळ रक्कम स्टोअर पॉलिसीनुसार समायोजित/परत केली जाऊ शकते.
- वारंवार हप्ता थकवल्यास सदस्यत्व रद्द किंवा स्थगित केले जाऊ शकते.
- रिडेम्प्शनपूर्वी ग्राहकाची ओळख व पेमेंट पडताळणी केली जाऊ शकते.
ही योजना खालील उद्देशांसाठीच आहे:
- ग्राहक लॉयल्टी प्रोग्राम
- ॲडव्हान्स प्रॉडक्ट खरेदी व्यवस्था
- रिटेल खरेदी सुविधा
ही योजना भारतातील लागू ग्राहक संरक्षण कायदे, कर कायदे आणि RBI च्या लागू नियमांनुसार चालवली जाईल.
या योजनेशी संबंधित सर्व वादांवर Pune येथील सक्षम न्यायालयांचे अधिकार क्षेत्र लागू राहील.